सिरोंचा – आलापल्ली – आष्टी या मुख्य रस्त्याची दैनिय अवस्था ; खा. अशोकजी नेते यांंनी दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश

57

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सिरोंचा – आलापल्ली – आष्टी या मुख्य रस्त्याच्या दैनिय अवस्थेची दखल घेत खा. अशोकजी नेते यांनी सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे सिरोंचा, आलापल्ली, आष्टी या मुख्य रस्त्याच्या दैनिय अवस्थेची पाहणी केली. रस्त्यावर खुप मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघात होने नाकारता येत नाही. या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे जड वाहतुकीची ट्राफिक बराच वेळ बंद होती. त्यामुळे याची दखल घेत फोनद्वारे अधिकाऱ्यांना निदैश दिले. तसेच सिरोंचा- आलापल्ली -आष्टी हा मेन रोड दुरूस्ती करण्यासाठी रोड टेंडर झालेला आहे. परंतु काम सुरू करण्यासाठी वनविभागाची अडचण निर्माण होत आहे. त्याकरिता संबंधित वन विभागाचे नोडल ऑफिसर यांंच्याशी संपर्क करून तातडीची बैठक घेऊन रोडसंबंधी लवकरच प्रश्न मार्गी लावून रोड दुरूस्तीचे काम चालु केल्या जाईल, असे निर्देश. खा. अशोकजी नेते यांनी दिले.
त्याप्रसंगी खा. अशोकजी नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, रविंद्रजी ओल्लालवार संघटन जि. महामंत्री, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.