जिल्हा काँग्रेसचे खासदार- आमदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

74

– जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ पूर पीडितांना आर्थिक मदत देण्याची केली मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सतत पूरपरिस्थिती निर्माण होत आहे व मेडिगट्टा व गोसेखुर्द येथूून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार – तिबार पेरणीचे संकट आलेे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यातील  शेतकऱ्यांंनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली तरी अशी परिस्थिती असताना सुद्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार, खासदार राज्य शासनानाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक मदत करण्यासाठी आवाज उठवला नाही. यावरून जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे? जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. परंतु जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही भरीव निधीची मदत करण्यात आलेली नाही. अश्या निद्रा अवस्थेत असलेल्या सरकारला व स्थानिक आमदार खासदारांना जागे करण्या साठी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरिता जिल्हा काँग्रेसच्या वतीने 20 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, गावतुरे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष रमेश चौधरी, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर,  जिल्हा उपाध्यक्ष शँकरराव सालोटकर, ता.अध्यक्ष नेताजी, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, रोजगार स्वयंम रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, विनोद लेनगुरे, समय्या पसुला, काशीनाथ भडके, वसंत राऊत, कुणाल पेंदोरकर, अब्दुल पंजवाणी, दिवाकर निसार, प्रभाकर कुबडे, ढिवरू मेश्राम, हरबाजी मोरे, दीपक रामने, रुपेश टिकले, संजय चन्ने, भैयाजी मुद्दमवार, श्रीनिवास ताडपल्लीवार, संदीप भैसारे, निखिल खोब्रागडे, तौफिक शेख, सुदर्शन उंदीरवाडे, राज डोंगरे, रुपेश सलामे, शुभम किरमे, प्रफुल बारसागडे,  अंकुश बारसागडे, चारुदत्त पोहणे, सुधीर बांबोळे, जावेद खान, स्वप्नील चौखुंडे, मजीद सय्यद, कल्पना नंदेश्वर, मंगला दास, सुनीता रायपुरे, आशा मेश्राम, अर्चना मेश्राम, नीलकंठ बावणे, मधुकर बावणे, दादाजी बावणे, शंंकनाथ बावणे, गजानन रोहनकर, मनोहर गेडाम, यशवंत गुरनुले, देविदास बोलीवार सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.