स्व. जगदिश ढाली यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भवानीपूर येथे भव्य फुटबॉल स्पर्धा

71

– बक्षीस वितरण समारोह कार्यक्रमाप्रसंगी खा. अशोकजी नेते यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : फुटबॉल प्रतियोगिता टूर्नामेंट मध्ये विजेत्या स्पर्धकांना व उपविजेता स्पर्धकांना खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.प्रथम बक्षीस २०००१/- सुंदरनगरच्या विजेत्याने पटकाविला. द्वितीय बक्षीस १५००१/- भवानीपुरच्या विजेत्याने पटकविला.
या कार्यक्रमाप्रसंगी खा. अशोकजी नेते यांनी युवकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी खा. अशोकजी नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, रविंद्रजी औलालवार संघटन जि. महामंत्री, डॉ. रंजित मंडल, डे, थापकर, गाईनजी संजीव सरकार, संजय सरकार, संदिप बिशवास, विजय बिशवास, तसेच अनेक युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.