ताडगाव (भामरागड) येथील तिर्थगिरीवार कुटुंबियांची खा. अशोकजी नेते यांनी घेतली सांत्वनपर भेट

141

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपाचे युवा कार्यकर्ते स्व. मनोज तिर्थगिरीवार रा. ताडगाव, ता.भामरागड हे रक्षाबंधनाला जात असताना वाटेत अपघात झाला. त्यामध्ये पती-पत्नी दोघेही मृत्यू पावले. त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी खा. अशोकजी नेते यांनी घरी जाऊन भेट दिली व आम्ही तुमच्या सुखदुःखात सहभागी आहोत असे बोलून ,दुःख सावरण्याचा बळ दिला.
त्याप्रसंगी खा. अशोकजी नेते. प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, रविंद्रजी ओल्लालवार संघटन जि. महामंत्री, राजु तिर्थगिरीवार कार्यकर्ते, विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष, सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष, धनंजय पडशाल उपस्थित होते.