चामोर्शी येथील परिसरातील युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या : खा. अशोकजी नेते

184

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथील परिसरात युवकांना कीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी उपविभागीय अधिकारी तोडासे यांची प्रत्यक्ष युवकांसोबत बैठक घेऊन या आठ दिवसांमध्ये क्रीडांगण उपलब्ध करून द्या, असे निर्देश खा. अशोकजी नेते यांनी दिले. वाढत्या वसाहतीमुळे चामोर्शी येथील छोटे- मोठे ग्राऊंड लुप्त होत चालले आहेत, त्यामुळे येथील युवा वर्ग नगरपंचायत आठवडी बाजाराच्या जागेवर क्रिकेट खेळतात. परंतु नगरपंचायतेतील कर्मचारी या खेळणाऱ्या मुलास त्या जागेवर खेळण्यास मनाई करतात. काही युवा वर्ग पोलीस भरतीच्या तयारी करिता आष्टी रोड, घोट रोड, गडचिरोली रोडला धावायला व व्यायाम करायला जात असतात. पण या सर्व रोडला मोठ्या प्रमाणात गाड्यांची रहदारी चालू असल्याने छोटे मोठे अपघात होत असतात, स्थानिक मुलांना क्रीडांगणाच्या अभावी दुसऱ्या शहरात जाऊन पोलिस भरतीची तयारी करावी लागते. त्यामुळे युवकांना क्रीडांगण हि एक दैनंदिन जीवनातील एक मुलभूत गरज आहे. परंतु तालुक्याच्या ठिकाणी क्रीडांगण नसेन ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्याकरिता चामोर्शी शहरात क्रीडांगणास जागा उपलब्ध करून द्यावे. याकरिता युवकांनी या क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांना ही बाब सांगितल्यावर उपविभागीय अधिकारी यांची बैठक घेऊन या आठ दिवसात युवकांना क्रीडांगण उपलब्ध करून द्या असे निर्देश खा. अशोकजी नेते यांनी दिले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस. टी. मोर्चा, रमेशजी बारसागडे किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, स्वप्निल वरघंटे प्रदेश सदस्य, प्रकाशजी अर्जुनवार सामाजिक कार्यकर्ते, भास्करजी बुरे ओबिसी मोर्चाचे सरचिटणीस उपविभागीय अधिकारी तोडासे, ठाणेदार शेवाळे तथा अधिकारी, कार्यकर्ते व अनेक युवकवर्ग उपस्थित होते.