हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रेखेगाव/अनंतपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

124

– कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून खा. अशोकजी नेते यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुवारी, 18 ऑगस्ट रोजी सामकी माता विद्या विकास मंडळ गडचिरोली द्वारा संचालित रेखेगाव/अनंतपूर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबचे व शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार अशोकजी नेते यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्याने जीवनामध्ये तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या समजल्या पाहिजे. जसे की विद्यार्थ्यांमध्ये दूरदृष्टी, कोणत्याही कामाबद्दलची एकाग्रता, (लगन) आत्मविश्वास, सहनशीलता या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी पाडल्या पाहिजे, असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी खा. अशोकजी नेते यांनी केले.

तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन प्रत्येक व्यक्तीने एकतरी वृक्ष लावला पाहिजे. वृक्षाची संवर्धन करणे ही एक काळाची गरज आहे, असे याप्रसंगी सुद्धा बोलल्या गेले.
मान्यवरांचा शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी अर्जुनवार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाप्रसंगीे सामकी माता विघा विकास मंडळाचे संस्थाध्यक्ष श्री. जी. एस. चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खा. अशोकजी नेते, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, डॉ. कुंभारे, प्रकाशजी अर्जुनवार सामाजिक कार्यकर्ते, संस्थाध्यक्ष जी. एस. चव्हाण, मनोहर हेपट, गौराबाई गावडे सरपंच, कुंदाताई सातपुते ग्रा.पं सदस्या, देवसिंगजी, तसेच प्राध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींंची उपस्थिती होती.