स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जिल्हा परिषद विभाग गडचिरोलीतर्फे विविध उपक्रम

66

– देशभक्तीपर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खा. अशोकजी नेते यांची उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा परिषद विभागातर्फे स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून देशभक्तीपर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारचे उपक्रम जसे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम रिक्रीरेशन हॉल जिल्हा क्रीडा कार्यालय कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खा. अशोकजी नेते यांनी स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव हा संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा केल्या जात आहे. शासन स्तरावर विविध ठिकाणी उपक्रम सुद्धा घेतल्या जात आहे. ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अंबपकर मुख्य लेखाधिकारी, फरेंद्र कुत्तीरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, धामणे शिक्षणाधिकारी तसेच अनेक अधिकारी, स्पर्धेतील विजेते व विद्यार्थिनींंची उपस्थिती होती.