ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राअतंर्गत वाघाच्या दहशतीची खा. अशोकजी नेते यांनी घेतली दखल

43

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राअतंर्गत वाघाची दहशत असून एकाच दिवशी दोन विविध घटना घडल्याची माहिती माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी खा. अशोकजी नेते यांना दिली असता तत्काळ याची दखल घेऊन ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी (DFO) दीपेश मल्होत्रा यांची तातडीने भेट घेऊन त्यांना झालेल्या घटनाविषयी सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली आणि त्यांना सक्त निर्देश दिले. संबंधित घटनेवर हयगय करू नये अशी ताकीद दिली. शासन स्तरावर जे काही मदत लागेलं ते आपण करुया व त्या व्यतिरिक्त इतर काही मदत लागेल त्याकरिता केंद्र सरकार तथा आपले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बोलून जे काही मदत करता येईल ते आपण तातडीने करू याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे सम्बधित प्रभाकर मडावी रा. पदमापूर (भुज) येथील जखमी इसमाची तसेच मृत्यु पावलेले मुखरू पैकु राऊत या दोन पीडितांच्या नातेवाईकाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अविनाश पाल, नागराज गेडाम माजी सभापती, मनोज वेटे नगरसेवक, मनोज भुपाल, देशकर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, रितेश अलमस्त माजी पं  स. सेलोटकर, साकेत भानारकर, सुयोग बाळबुधे, राऊत माजी सभापती तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.