संताजी प्रभाग येथून हरांबा गावाकडे जाणारा रस्ता गेला वाहून

67

– पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे झाले प्रचंड नुकसान

– राज्य शासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी : नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांंची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथील हरांबा रोडकडे जाणारा रस्ता वाहून गेला व येथील गोरगरीब जनतेनी दुबार पेरणी केली. परंतु शेतकऱ्यांचे संंतततधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले व या मुसळधार पावसामुळे शेतकरी, शेतमजूर बांधवांचे दुबार पेरणी केलेली पिके पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्य शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी व वाहून गेलेला रस्ता तत्काळ बनवून देण्यात यावी, अशी मागणी संताजीनगर गोंडपुरा येथील नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, नगरसेविका सोनालीताई पिपरे यांनी केले.
आज भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीषभाऊ पिपरे यांनी सदर ठिकाणी
स्वतः भेट देऊन येथिल शेतकऱ्यांंसोबत स्वतः भेट देऊन संवाद साधला व येथील शेतकऱ्यांनी आपली आपबिती सांगितली. यावेळी रवींद्र लटारे, सुभाष कोठारे, गुरुदेव धोडरे, प्रमोद भुरसे, भैय्याजी धोडरे व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.