घराघरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया : खा. अशोकजी नेते

100

– भाजपा गडचिरोलीतर्फे खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातून काढली भव्य तिरंगा रथयात्रा व बाईक रॅली

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य तिरंगा रथयात्रा व बाईक रॅलीचे कारगिल चौक गडचिरोली येथे आयोजन करण्यात आले. या क्षेत्राचे खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रथयात्रेचा शुभारंभ भारत मातेच्या जयघोषाने करण्यात आली. तसेच खा. अशोकजी नेते यांनी रॅलीमध्ये बाईकस्वार होऊन भारत माता की जय अशा जयघोषाने हिरवी झेंडी व तिरंगा दाखवून सुरूवात करण्यात आली.
या बाईक रॅलीत भाजपासह सर्व आघाड्यांंचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालेे होते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्ती ने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली कारगिल चौक येथून गडचिरोली शहरातून, गांधी चौक इंदिरानगर, रेड्डी गोडाऊन, गोकुलनगर, आय.टि.आय. चौक, एल.आय.सी. ऑफिस, कोर्ट, कॉम्प्लेक्स मार्गाने फिरवून खासदार साहेबांंच्या जनसंपर्क कार्यालयात समारोप करण्यात आला.

या बाईक रॅलीमध्ये 300 बाईकनी सहभाग घेतला. याप्रसंगी खा. अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस संघटन भाजपा एस.टी मोर्चा, गोविंदजी सारडा जिल्हा महामंत्री, प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री, रवींद्र ओल्लालवार जिल्हा महामंत्री, प्रमोद पिपरे जिल्हा महामंत्री, चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, रेखाताई डोळस प्रदेश सदस्या महिला आघाडी मोर्चा, रमेश बारसागडे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, रमेशजी भुरसे प्रदेश सदस्य, भारत खटी जिल्हा उपाध्यक्ष, अरूण हरडे माजी उपाध्यक्ष, विलास देशमुखे पं. स. माजी उपसभापती, संजय बारापात्रे जिल्हा सरचिटणीस युवामोर्चा, योगिताताई पिपरे माजी नगराध्यक्ष, योगिताताई भांडेकर माजी जि. प. अध्यक्षा, विलास पा. भांडेकर ता. संपर्कप्रमुख, वसंतराव कुलसंगे, अनिल पोहनकर जिल्हा उपाध्यक्ष, अनिल कुनघाडकर माजी न.प उपाध्यक्ष, विजय शेडमाके शहर अध्यक्ष आदिवासी आघाडी, मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष, सागर कुमरे युवा शहर अध्यक्ष, गिताताई हिंगे, वैष्णवी नैताम, रश्मी बानमारे, भारती सरोदे, निताताई उंदिरवाडे, सलीमभाई अल्पसंख्याक आघाडी, अली ताई, पठाण ताई, वछलाताई मुनघाटे, पुष्पाताई करकाडे, रंजीता कोडाप जि. प. माजी सभापती. विजय कुमरे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.