भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी चामोर्शी येथे काढली भव्य बाईक रॅली

96

– शहरातील शेकडो युवकांनी बाईक रॅलीत स्वयंस्फूर्तीने घेतला सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज, 13 ऑगस्ट रोजी चामोर्शी शहरातील मुख्य मार्गावरून बाईकवर तिरंगा लाऊन येथील शेकडो युवकांची भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.
या तिरंगा यात्रेत भाजपा युवा मोर्चा, महिला आघाडी, सर्व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी, हर घर तिरंगा अभियान संदेश देण्यासाठी तथा सामाजिक एकता व देश भक्ती संदेश देण्यासाठी चामोर्शी येथील लक्ष्मी गेट मुख्य चौक येथे बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी एकत्रित आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, नगरसेवक आशीष पिपरे, तुषारभाऊ दूधबावरे, सोशल मीडिया संयोजक गडचिरोली विधानसभा रमेश अधिकारी, युवा नेते निखिल धोडरे यांनी तिरंगा यात्रेचे नेतृत्व केले. या तिरंगा यात्रेत शहरातील, पाचशेच्यावर युवक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. या रॅलीला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्र. सो. गुंडावार गुरुजी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. सदर रॅली आधी बस स्टँड मार्गाने एच. पी, पेट्रोलपंप समोरून वळसा घेऊन पंचायत समिती समोरून आष्टी मार्गाने तहसील कार्यालय समोरून पुन्हा बस स्टँड मार्गाने वाळवंटी चौक, पोलीस स्टेशन समोरून सोसायटी समोरून मुख्य मार्केट लाईनमधून बाजार येथील शहीद स्तंभ जवळ जमा झाले. यावेळी पावसाने हजेरी लावली. परंतु येथील युवकांनी पुन्हा चवडेश्र्वरी मंदिर समोरून अलंकार पेट्रोल पंप समोरून लक्ष्मी गेट मार्गाने बाजार चौक येथील शहीद स्मारक येथे आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शिल्पा रॉय, नगरसेविका रोशनीताई वरघंटे, गीताताई सोरते, सोनालीताई पिपरे, युवा नेते नरेश अल्सावार, रेवनाथ कुसराम, लक्ष्मण वासेकर, विनोद किरमे, शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने स्थानिक बाजार चौक येथे शहीद स्तंभासमोर मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व राष्ट्रगीत म्हणून या रॅलीचे समारोप करण्यात आला.