पोरेड्डीवार महाविद्यालयाच्या वतीने चातगाव ग्रामपंचायतीत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात

70

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील कै. महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी चातगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांंना राख्या बांधल्या.

याप्रसंगी चातगावचे सरपंच गोपाल उईके, प्रा. वासुदेव तडसे, क्रिष्णा तडसे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थिनी आदींची उपस्थिती होती.