– मा. उद्धव साहेब… ! गडचिरोलीतील समस्त शिवसैनिक तुमच्या पाठीशी
– शिवसैनिकांच्या पाठींब्यांचे शपथपत्र केले मा. उध्दवजी ठाकरे साहेबांच्या हाती सुपूर्द
विदर्भ क्रांंती न्यूज
गडचिरोली : शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांची साथ सोडून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याशी घरोबा निर्माण केला असला तरी राज्यभरातील शिवसैनिकांचे मा. उध्दव साहेबांवरील प्रेम कमी झालेले नाही. गडचिरोली जिल्हयातील शिवसैनिक सुध्दा मा. शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मा. उद्धव साहेबांना पाठींबा देण्यासाठी शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठून शपथपत्राद्वारे समर्थन दिले. गडचिरोली जिल्हयातील समस्त शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत, मा. उद्धव साहेब तुम्ही आम्हाला बळ द्या, आम्ही पुन्हा जोमाने काम करून शिवसेनेची गडचिरोली जिल्हयात ताकद वाढविणार, अशी ग्वाही दिली. मा. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी गडचिरोलीतील शिवैसनिकांचे शपथपत्र स्विकारून शिवसैनिकांना मार्गदर्शन करून मनोबल उंचावले. शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव साहेब ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी शपथपत्रा़द्वारे समर्थन देण्याची मोहिम राबविण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत सदर मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली. शिवसैनिकांनी पक्ष प्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांना शपथपत्राद्वारे दिलेले समर्थन पोहचविण्यासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या शिवसैनिकांसह मुंबई गाठून शिवसैनिकांंची पंढरी मातोश्रीत जाऊन मा. उध्दव साहेब ठाकरे यांच्या हाती शिवसैनिकांच्या पाठींब्यांचे शपथपत्र सुपूर्द केले. तत्पुर्वी जय भवानी – जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, मा. उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो, मा. उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, मा. उद्धवजी संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं,ग़द्दाराना क्षमा नाही, अशा गगनभेदी घोषणा देत गडचिरोली येथील शिवसैनिक शिवसैनिकासाठी पंढरी असलेल्या मातोश्रीवर पोहचले.गडचिरोली येथील शिवसैनिक आपल्या भेटीसाठी आल्याचे पाहून मा. उध्दवसाहेब ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर येत शिवसैैनिकांने स्वागत केले. गडचिरोलीतील शिवसैनिकांचे आपल्यावर कायम असलेले प्रेम पाहून ते आनंदी झाले. आता आपल्याला नव्या दमाने लढायचं आणि जिंकून दाखवायचं आहे. यासाठी तत्पर राहा आणि आम्ही मा.बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, हे विरोधकांना दाखवून द्या, असा उपदेशही शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवसाहेब ठाकरे यांनी गडचिरोतील शिवसैनिकांना केला. मा. उध्दव साहेबांच्या झालेल्या भेटीमुळे गडचिरोतील शिवसैनिकांचे चेहरे आंनदाने फुललेे आणि उत्साह संचारला. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील समस्थ शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.