आजारी स्त्री, पुरुष व बालकांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी

56

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील महिला व बाल रुग्णालय येथे मुंबई येथून आल्याबरोबर गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सदिच्छा भेट दिली व येथे भरती माता भगिनी यांची येथील रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यावेळी बोलतांना सांगितले. जिल्ह्यातील पुरुष, महिला व बाल रुग्णांच्या उपचारा दरम्यान कोणतेही अल्गर्जी पना खपऊन घेणार नाही व येथील भरती रुग्णांचे सर्व उपचार व्यवस्थित झाले पाहिजे असे प्रतिपादन केले. जिल्ह्यातील स्त्री, पुरुष व बाल रुग्णालयात पुन्हा आधुनिकिकरण करण्यात येईल व शिवसेना व भाजप सरकारमध्ये निधीची कोणतेही कमतरता पडू देणार नाही. परंतु आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये व आवश्यक उपचार करण्यात यावे, असे सांगितले. यावेळी प्रामुख्याने येथील जिल्हा शल्यचिकित्सक,  डॉक्टर्स, नर्सेस व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.