शेतीपूरक रोजगार हिरावलेल्या गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा व मोहटोला येथील शेतकऱ्यांना शिवसेनेने दिला आधार ..!

113

– शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस सेवाभाववृत्तीने साजरा

– नुकसानग्रस्त पशुपालकांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांनी केली आर्थिक मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवसेना ही जनसेवेसाठी वाहून घेतलेली गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणारी सेना आहे. शिवसेनेने सेवाभाव नेहमी जपला असून त्याचा प्रत्यय नेहमीच दिसून येतो. शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांनी आपला वाढदिवस झगमगाटात साजरा न करता सेवाभाववृत्तीने करण्याचे आवाहन आपल्या शिवसैनिकांना केले होते. त्यानुसार जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सेवाभाव जोपासत वाघाने जनावरे ठार केलेल्या अमिर्झा- मौशीखांब जिल्हा परिषद क्षेत्रातील चांभार्डा व मोहटोला येथील नुकसाग्रस्त पशूपालकांना आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले.

गडचिरोली तालुक्यातील शेतकरी धर्माजी सुरकर हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून दुधाळू गायी खरेदी केली होती. दुग्ध व्यवसायामुळे कुटुंबाचा गाडा सुरळीत चालत होता. त्यांनी आपली दुधाळू गाय नेहमीप्रमाणे गाव परिसरात चरण्यासाठी सोडली. त्यांच्या दुधाळू गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. त्यामुळे सुरकर यांचा दुग्धव्यवसाय बंद पडला अल्पभूधारक शेतकरी असलेल्या सुरकर यांच्या दुग्धव्यवसायाचे साधन वाघाने हिरावून घेतल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले.
ज्या गायीच्या दुधावर कुटुंबाचा उदरनिवार्ह होता ती गाय वाघाने ठार मारल्याने चांभार्डा येथील शेतकरी सुरकर यांच्यावर संकट कोसळले चांभार्डा येथील शिवसैनिकांंनी शेतकऱ्यावर ओढावलेल्या संकटाची माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याचा प्रत्यय देत अरविंदभाऊ कात्रटवार यांनी चांभार्डा येथील गरीब शेतकरी धर्माजी सुरकर यांच्या घरी जाऊन शिवसैनिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आर्थिक मदत दिली. शासनाकडून वनविभागाच्या वतीने देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी याप्रसंगी दिले.
वाघाच्या हल्ल्याची दुसरी घटना मोहटोला येथे घडली. वाघाने मोहटोला येथील पशुपालक कुसन नारायण लोहंबरे यांच्या ४ शेळ्यांना ठार केले. त्यामुळे लोहंबरे यांचे मोठे नुकसान झाले. आजच्या महागाईच्या काळात कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला. परंतू वाघाने चार शेळ्यांना ठार केल्याने त्यांचा रोजगारच हिरावल्या गेल्याने ते चिंतेत सापडले. लोहंबरे यांची हलाखीची स्थिती लक्षात घेता शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी लोहंबरे यांना आर्थिक मदत करून आधार दिला. एक कट्टर शिवसैनिक म्हणून जनसेवेसाठी तत्पर असून कोणतीही समस्या असल्यास मला अवगत करून द्या, ती सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन, अशी ग्वाही सुध्दा शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी चांभार्डा, मोहटोला येथील नागरिकांना दिली. गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन कात्रटवार यांनी सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले असून सेवाभाव जोपाणाऱ्याप्रती जनता नेहमी सोबत राहील, अशी प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, संजय बोबाटे, नवनाथ ऊके, संदीप अलबनकर, सूरज उइके, स्वप्निल खांडरे, निरंजन लोहबरे, संदीप भुरसे, गोपाल मोगरकर, बापूजी वासेकर, नानाजी काळबान्धे, हरबाजी दाजगये, रामदास बह्यल, निकेश लोहबरे, भास्कर भुरसे, तानबा दाजगये, विकास उन्दिरवाडे, विलास दाजगये, रविंद्र मिसार, शामराव कुकुड़कर, विनोद मड़ावी, सुनील सोनटक्के, चंद्रभान मड़ावी, जगन चापडे, किसान लोहबरे, मंगरु कुकुड़कर, अरुण बरापत्रे उपस्थित होते.