काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

54

– जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व पूरग्रस्तांशी साधणार संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील बरेच भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक गावे रस्त्यावर आली. सोबतच शेतीचे सुद्धा अतोनात नुकसान झाले. अश्या परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दौरा केले. परंतु अद्यापही जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक पॅकेजची किंवा अन्य मदतीची घोषणा झालेली नाही. अश्या परिस्थितीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले आज, 29 जुलै रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिली आहे.