गडचिरोली जिल्ह्यात आज 2 कोरोना बाधित तर 6 कोरोनामुक्त

60

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 171 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 2 असून कोरोनामुक्ताची संख्या 6 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37689 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36863 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 51 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.14 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. आज नविन बाधितांंमध्ये गडचिरोली तालुक्यातील 1, आरमोरी तालुक्यातील 1, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 1, आरमोरी तालुक्यातील 2 व कुरखेडा तालुक्यातील 3 जणांंचा समावेश आहे.