Home गडचिरोली डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षीय बालकाचा गडचिरोली येथील महिला रुग्णालयात मृत्यू

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षीय बालकाचा गडचिरोली येथील महिला रुग्णालयात मृत्यू

125

– जबाबदार डॉक्टरावर गुन्हा दाखल करुन निलबिंत करा : पालकासह परिवाराची मागणी

– खासदार अशोक नेते यांंनी घेतली या प्रकरणाची दखल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका दोन वर्षीय बालकाचा गडचिरोली येथील महिला रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. पार्थ आशीष प्रधाने (२ वर्ष) असे मृतक बालकाचे नाव असून तो सावली येथील रहिवाशी होता. काल अचानक दोन वर्षीय पार्थची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारार्थ गडचिरोली येथील महिला रुग्णालयात भरती करण्यात आले. परिणामी प्रकृती खालावत असताना तीन तास होऊनही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरानी साधी पाहणी सुद्धा केली नाही. परिणामी दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने पालकासह परिवारातील लोकांनी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या डाक्टरावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील पार्थ आशिष प्रधाने या दोन वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उपचारासाठी गडचिरोली येथील महिला रूग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असताना ते ड्युटीवर हजर नव्हते. वारंवार फोन करूनही डॉक्टर आले नाही. डॉ. उईके काल सकाळी ७. ४५ वाजता आले. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली. त्यानूसार चौकशी सुरू केली व मृतकाचे शव पोस्टमार्टमसाठी पाठविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खासदार अशोकजी नेते यांंनी भेेट देेेऊन प्रधाने परिवाराचे सांत्वन करीत सदर डॉक्टरावर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही परिवारातील लोकांना दिली. सोबतच महिला रुग्णालयातील सर्व डाक्टरांची बैठक घेऊन तसेच मा. जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या सोबत बैठक घेऊन सदर डॉक्टरवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी खासदरांंनी केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, श्याम हटवादे, निखिल सुरमवार, मनोज अमराजवार, चन्द्रकांत प्रधाने उपस्थित होते.

error: Content is protected !!