खा. अशोकजी नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होण्यासाठी सतत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याला अखेर यश

124

– गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन भवन गडचिरोली येथे पूरग्रस्त आढावा संदर्भात 11 जुुुलै रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आरोग्य जनतेला मिळावे हया दृष्टिकोनातून जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारण्याची घोषणा केली.
मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याकरिता वैघकीय महाविद्यालयाची घोषणा केल्याबद्दल.. खा. अशोकजी नेते यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यासाठी मा. खा. अशोकजी नेते यांनी सतत केलेल्या मागणीला व पाठपुराव्याने लोकसभेत 2020 मध्ये तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करा, ही मागणी लोकसभेतून केली होती. त्यानुसार तत्कालीन आरोग्यमंत्री मा. डॉ. हर्षवर्धनजी यांनी उत्तरात सांगितले होते की, राज्य शासनाकडून प्रस्ताव लवकर पाठवा‌. त्यानुसार राज्यशासनाकडून प्रस्ताव आल्यावर मेडिकल कॉलेज मंजूर करू, असे आश्वासन दिले होते. त्यासाठी पत्राच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा पत्राद्वारे मागणी केली होती. तसेच तात्कालीन पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे सुद्धा मागणी करून चर्चा केली होती.
याच अनुषंगाने दिनांक11 जुलै 2022 गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, तसेच पूरग्रस्तांचा आढावा संबंधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याकरिता वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केल्याबद्दल मा. खा. अशोकजी नेते यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते, आ. डाॅ. देवरावजी होळी, आ. कृष्णाची गजबे, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, महामंत्री प्रशांतजी प्रशांत वाघरे, महामंत्री गोविंदजी सारडा, महामंत्री प्रमोदजी पिपरे, प्रदेश सदस्य स्वप्निलजी वरघंटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, अविनाश पाल, संजयजी बारापात्रे, कमिशनर मॅडम, जिल्हाधिकारी संजय मीना तसेच अनेक अधिकारीवर्ग, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.