आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाकडून पंडित जवाहरलाल नेहरू नप उच्च प्राथमिक शाळेला शालेय पुस्तके भेट

59

– माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या लोकप्रिय माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधून आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाकडून पंडित जवाहरलाल नेहरू न. प. उच्च प्राथमिक शाळा येथील वाचनालयाला २०० शालेय पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आले.
सनातन संस्थेच्या प्रेरणेने आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री. गोहणे सर यांना पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करण्यात आले.
यावेळी सनातन संस्थेच्या जिल्हा संयोजिका प्रगती मामीडवार, काळे मॅडम, महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, अल्का पोहनकर, रश्मी बानमारे, कोमल बारसागडे, पुनम हेमके, रुपाली सातपुते, वनमाला कन्नाके, युवा मोर्चा शहर महामंत्री राजु शेरकी, देवाजी लाटकर, ऋषी पिपरे, लताताई समर्थ, महेंद्र शेडमाके, रवींद्र गंधेवार उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू न. प. उच्च प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक श्री. गोहणे सर, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देवून माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.