कोपरअल्ली येथे महाराजस्व शिबिराचे आयोजन

119

– महाराजस्व शिबिरातून घरपोहच प्रमाणपत्र

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव निमित्त कोपरअल्ली येथील भव्य महाराजस्व शिबिरामध्ये जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, शिधापत्रिका व इतर आवश्यक कागदपत्रे तात्काळ शिबिरस्थळी मिळाल्याचे समाधान कोपरअल्ली परिसरीरातील नागरीकांना आला. तालुका महसूल प्रशासन मुलचेराच्या वतीने कोपरअल्ली येथे महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन उत्तमराव तोडसाम उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून कपिल हाटकर तहसिलदार मुलचेरा, संजय नागटिळक तहसिलदार चामोर्शी, नायब तहसिलदार राजेंद्र तलांडे, नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, संवर्ग विकास अधिकारी मनोहर रामटेके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, क्षेत्र सहाय्यक मांडवगडे, कोपरअल्लीचे सरपंच रोशनी कुसनाके, उपसरपंच मनोज बंडावार, मल्लेराचे सरपंच अरुण कडते, माजी उपसभापती प्रगतीताई बंडावार, माजी उपसभापती आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरामध्ये तयार झालेले 558 जातीचे प्रमानपत्र, 277 अधिवास प्रमाणपत्र, 778 हयात प्रमाणपत्र, 6 संजय गांधी निराधार मंजुरी आदेश, वनहक्क सातबारा 555 ,नैसर्गिक आपत्तीचे बावीस हजाराचा धनादेश इत्यादी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिरस्थळी प्राथमीक आरोग्य केंद सुंदरनगरचे वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आला. शिबीरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मुलचेरा, पंचायत समिती मुलचेरा, पुरवठा विभाग मुलचेरा, संजय गांधी शाखा मूलचेरा, पशुसंवर्धन विभाग मूलचेरा, वनविभाग वनपरिक्षेत्र मार्कंडा(कं) यांचे वतीने स्टॉल लावून त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची महिती तसेच जनजागृती शिबिरस्थळी केली.कार्यक्रमाला कोपरअल्ली परीसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मंडळ अधिकारी वाय. पी. भांडेकर, कोपरअल्लीचे तलाठी आर. एस. कलगटवार, मुलचेराचे तलाठी प्रशांत मेश्राम, अनिल बुरमवार, सखाराम दिवटीवार, प्रमोद गुट्टेवार, विनोद कंन्नाके ,संतोष आत्राम, रविंद्र झाडे, सर्व कोतवाल, सर्व पोलिस पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लगामचे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.