स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या विचारधारेतूनच जीवनाची सार्थकता : शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

86

– स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली तालुक्यातील मौशिख़ाब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील टेंभा या गावी शेकडो माता-भगिंनींना वस्त्रभेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या “ने मजसी ने परत मातृभूमीला,सागरा प्राण तळमळला” या काव्य पंक्ती आठवल्या की साऱ्या भारतीयांचे मन देशप्रेमाने भारावून जाते. भारतीय स्वातंत्र लढयात वि. दा. सावरकरांचे महत्वपूर्ण योगदान आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून आपल्या भारत देशाला मुक्त करण्यासाठी सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा भोगावी लागली. अशा परिस्थितीला डगमगून न जाता त्यांनी देशसेवेसाठी केलेले कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. वि. दा. सावरकरांचे कार्य व विचाराची आजच्या समाजाला गरज असून कोणतेही कार्य करताना सेवाभाव जोपासून उदात्त ध्येयाने केलेल्या कार्यातून मिळणारे समाधान हीच जीवनाची खरी सार्थकता आहे. थोर स्वातंत्रसेनानी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील मौशिख़ांंब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील टेंभा येथे जंयती समारोह व माता भगिंनींसाठी वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणातून ते बोलत होते. पुढे बोलताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, कोणतेही कार्य करताना संकटाला न घाबरता दृढनिश्चय, चिकाटी व मेहनतीची गरज आहे. तेव्हाच आपण हाती घेतलेल्या कार्याला यश प्राप्त होईल. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या कार्यातून आजच्या समाजाला खूप काही शिकण्याची गरज आहे. सावरकरांनी बंदी जीवन संपल्यानंतर समाजातील अस्पृश्यता व कुप्रथा विरूध्द आंदोलन केले. आजच्या आधुनिक युगात स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने अधिकार प्राप्त झाले असले तरी समाजामध्ये आजही अनेक स्त्रियांना बंधनाचा सामना करावा लागतो. त्यामुळे समाजातील अनिष्ट चालीरिती, अस्पृश्यता, कुप्रथा बंद झाल्या पाहिजेत. महिला ही अबला नसून ती रणरागिणी आहे हे दाखवून होणाऱ्या अन्याय व अत्याचाराचा धैर्याने सामना केला पाहिजे, असेही अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट देण्यात आली. शिवसेनेच्या वतीने वस्त्रभेट कार्यक्रमातून सामाजिक बंधीलकीचे दर्शन घडविले आहे. असे सामाजिक कार्य फक्त शिवसेनाच करू शकते असे भावोद्गार यावेळी टेभा येथील अनेक माता -भगिनिनी काढले.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी आधुनिक विचारधारा अंगिकारुन हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी बुद्धी व विज्ञाननिष्ठा यांची कास धरुन लढा दिला.देशाला धार्मिक अज्ञानाच्या युगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हाच खरा धर्म असल्याचे मानले. सावरकरांचे विचार प्रेरणादायी होते. त्यांनी देशवासीयांमध्ये देशप्रेम जागृत केले. त्यांचे प्रेरणात्मक विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके, संजय बोबाटे, नानाजी काळबान्धे, टेंंभा येथील सरपंच सुनीता भजभूजे, उपसरपंच रामचंद्र कस्तूरे, सदस्य धनेश्वर बानबले, मोरेश्वर वाकड़े, अरुणा चनेकर, मिनाशी कुमरे, रुचिला ठाकरे, मंदा परचाके, संदीप अलबनकर, सूरज उइके, संदीप भैसारे, पंढरी चौके, संदीप भुरसे, निकेश लोहबरे, स्वप्निल खांडरे, प्रशांत ठाकुर, राहुल सोरते, निरंजन लोहबरे, गोपाल मोगरकर, अमित बानबले, दिलीप चनेकर, चुलराम मुंनघाटे, हरीश बानबले, भुनेश्वर अम्बादे, भगवान चनेकर, आकाश बानबले, तानाजी हातबले, अंबादास मुंनघाटे, विशाल नैताम, आकाश नैताम, सुरेश झरकार, लोकेश नैताम, नाना चुधरी, मिथुन मड़ावी, रूपेश बानबले, राकेश मुनघाटे, भोजराज नायते, नागेश धारने यांच्यासह टेंंभा येथील शिवसैनिक व गावकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.