Home गडचिरोली जिल्हा तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी ग्रीष्मा मून

जिल्हा तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी ग्रीष्मा मून

29

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चोकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी व इतर सदस्य यांची शासनाने एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीच्या अध्यक्ष पदावर गेल्या 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात विविध समाज उपयोगी उपक्रम घेत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ग्रीष्मा विवेक मून (रा. नवेगाव गडचिरोली) यांची मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी नियुक्ती केलेली आहे.

या नियुक्तीने मी समाजातील शोषित महिला वर्गाकरिता त्यांच्या न्याय हक्कासाठी काम करुन चांगला समाज घडविता येईल व मी पुरेपुरे प्रयत्नशील असेल. ही नियुक्ती म्हणजे मला जागतिक महिला दिना (8 मार्च) निमित्त मिळालेला सन्मान आहे, असे मत ग्रीष्मा मून यांनी व्यक्त केलेले आहे.

सदर नियुक्तीबद्दल गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, नगरसेवक लीलाधर भरडकर, विवेक मून, सामाजिक कार्यकर्ते राजेश कात्रटवार, साई सेवा समितीचे लीलाधर सूत्रपवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ. बाळू सहारे, डॉ. उज्वला सहारे, डॉ. यशवंत दुर्गे, डॉ. खुशबु दुर्गे, डॉ. मुकुंद ढबाले, डॉ. अंजली साखरे, डॉ. खुशाल दुर्गे, डॉ. नगराळे, समाजसेविका कुसुमताई आलाम, नगरसेविका योगिता पिपरे, नागसेन खोब्रागडे, मुख्यध्यापक विवेकानंद हुलके, अतुल आलंपटलावर, विलास पारखी, उपेंद्र रोहनकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे देवानंद कामडी यांच्यासह विविध राजकीय, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवारांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

error: Content is protected !!