विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यात निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसून येते. यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा ही महत्वपूर्ण असून सामान्य नागरिकांना न्याय देणारी आहे. याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार आहे.
यासोबतच शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याकरिता भरीव निधीची तरतूद केल्याने विकासाला चालना मिळणार. युवकांना रोजगार निर्मितीकरिता उद्योग उभारणीला चालना देण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. आरोग्य, दळणवळणाची सुविधांसह विदर्भाच्या विकासाला चालणा देणाऱ्या बाबींचा समावेश करण्यात आला असल्याने हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा न. प. पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी दिली आहे.







