Home गडचिरोली अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसह महिलांचा सन्मान : धर्मरावबाबा आत्राम

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसह महिलांचा सन्मान : धर्मरावबाबा आत्राम

30

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सादर होणारा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसमावेश बाबींचा समावेश झालेला आहे. यात निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर करण्यात आलेल्या अनेक घोषणा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतकऱ्यांची २ लाखापर्यंतची कर्जमाफी, महिलांसाठी सुरू असलेली लाकडी बहिण योजना पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय, यासोबतच एकल महिला योजना सुरू करण्याचा प्रयत्न, रोजगार निर्मितीसाठी पुढाकार, दळणवळण, पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी नवीन वाहन खरेदीवर सवलत, शेतीची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भरीव तरतूद, मत्स्यपालन, पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत गरजा लक्षात घेऊन सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

error: Content is protected !!