– नगरसेवकावर कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाच्या नावावर काही महिलांची चामोर्शी येथील नगरसेवक आशीष अरुण पिपरे व त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे यांनी फसवणूक केल्याचा आरोप अन्यायग्रस्त महिलांनी येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित ऑल गडचिरोली मीडिया असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत केला आहे.
चामोर्शी येथील काही महिलांनी नगरसेवक आशीष अरुण पिपरे व त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे यांच्यावर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करून आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, इशारा पत्रपरिषदेतून देण्यात आला आहे.
पीडित महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, सन २०२० मध्ये स्वयंपूर्ण रोजगार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देत आशीष पिपरे यांनी सुमारे ४० महिलांना स्वतःच्या घरी बोलावून बैठका घेतल्या. अगरबत्ती निर्मिती प्रकल्पासाठी बँकेमार्फत कर्ज मंजूर करून देतो व कर्जमाफ करून देतो, असे सांगून प्रत्येक महिलेकडून अर्ज घेतल्याचा आरोप पत्रकार परिषदमध्ये करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेला कविता दिलीप किरमे, मीनाक्षी देवराव पिपरे, देवांगना महेश गौतम, निवृत्ता प्रकाश गव्हारे, निहल्ला प्रकाश गृच्छारी, शीला पुरुषोत्तम धोडरे, एस. पी. धोडेरे, कविता रवी कारडे, कविता रवि कारडे, सुषमा सतीश धोडरे, रेखा सुनील गव्हारे, छाया उमाजी बोदलकर, मेनू विनोद धोडरे, वेणू विनोद घोरे, अनिता गुणवंत पिपरे, अनिता पिके, मनीषा योगेश्वर गव्हारे, सुषमा राजेश बुरांडे, सुषमा राजेश बुरोडे, अर्चना किशोर बुरांडे, शारदा बबन पिपरे, साधना बाळा धोडरे, एस. बी. धोडरे, जयश्री रमेश पिपरे, वंदना सविंद्र कोठारे, अर्चना सुनील धोडरे, चंद्रशेखर हरिश्चंद्र मस्के, ओमदास कवडू झरकर, नितेश दत्तू पिपरे, मिलिंद नामदेव भांडेकर, आश्विनी धनराज गव्हारे आदी उपस्थित होते.







