– ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दर्शविली सोहळ्याला उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : वारकरी संप्रदाय तथा बहुउद्देशीय विकास संस्था कान्होली व समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने गावात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण व्हावे, समाजात सद्भावना, नैतिकता व संस्कार रुजावेत या उदात्त हेतूने श्रीमद् भागवत सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन व हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पवित्र श्रीमद् भागवत सप्ताह प्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी उपस्थित राहून भक्तगणांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, जिल्हा महासचिव नदीम नाथानी, अनुसूचित जातीच जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, विजय लाड, प्रफुल बारासागडे, नेहाल आभारे, बादल धोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने भक्तगण, वारकरी, महिला, युवक व ग्रामस्थांनी या सोहळ्यास उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.







