Home गडचिरोली गडचिरोली नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निखिल चरडे

गडचिरोली नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निखिल चरडे

185
– स्वीकृत नगरसेवक म्हणून सागर निंबोरकर, सुधाकर यनगंधलवार, नंदू कायरकर यांची निवड
– नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन केले चरडे यांचे स्वागत
विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली शहरातील प्रभाग १२ मधून प्रचंड मतांनी निवडून आलेले युवा नगरसेवक निखिल चरडे यांची नगर परिषद उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडून आलेले ते सर्वात युवा नेतृत्व आहेत. त्यांच्या निवडीमुळे सर्वचा स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सागर निंबोरकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर यनगंधलवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नंदू कायरकर यांची निवड करण्यात आली.

आज, १५ जानेवारीला झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीत गडचिरोली शहरातून निवडून आलेले सर्व नगरसेवक उपस्थित होते.

error: Content is protected !!