Home गडचिरोली आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी

306

– शिष्टमंडळाद्वारे सादर केले निवेदन : प्रकल्प अधिकारी अरुण एम यांचे सकारात्मक आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम यांची भेट घेऊन बुधवार, १४ जानेवारी रोजी सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाद्वारे प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या.

संघटनेचे गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड व अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे विभागीय सहसचिव विकास जनबंधू यांच्या नेतृत्वात प्रकल्प अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. खेळीमेळीच्या वातावरणात निवेदनातील सर्व मागण्या व समस्या प्रकल्प अधिकारी अरुण एम यांनी क्रमाक्रमाने जाणून घेतल्या. सकारात्मक प्रतिसाद देत बहुतांश मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले.यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ. प्रभू सादमवार व प्रकल्प कार्यालयातील संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

सादर केलेल्या निवेदनात शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांना ४३०० ग्रेड वेतन नुसार तसेच अनुदानित आश्रम शाळेतील माध्यमिक शिक्षकांना ४८०० ग्रेड वेतन नुसार सुधारीत एकस्तर वेतन निश्चित करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला करणे, संबंधित कर्मचाऱ्यांना १ हजार ५०० रुपये आदिवासी प्रोत्साहन भत्ता लागू करून थकबाकी अदा करणे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे पुनर्जीवित करणे व रिक्त पदे भरणे, विद्यार्थी प्रवेश भरतीच्या कारणाने रोखलेल्या वार्षिक वेतनवाढी लावणे, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा मंजूर करणे, महिला सफाईगार, महिला चौकीदार व सुरक्षा रक्षक पदे भरणे आदींसह काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मागण्या व समस्यांचा समावेश आहे.

यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे प्रकल्प सचिव ज्ञानेश्वर घुटके, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधी संतोष धोटे, रमेश कोरचा,सचिन खोब्रागडे, वाय. बी. गोंगल, सुनिता मस्के, किसनदेव टिकले, ए. एम. नरुले, राजू मेश्राम, गिरीधर पातेवार, पुरुषोत्तम डोंगरवार, अविनाश डूडूल, सुधीर भोयर, बालकिसन चिंतल, प्रमोद शेबे, रमेश राऊत, खुशाल नाकाडे आदींसह शासकीय व अनुदानित आश्रम शाळांचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!