Home गडचिरोली गडचिरोलीत भाजपाने केला वीर बाल दिवस उत्साहात साजरा

गडचिरोलीत भाजपाने केला वीर बाल दिवस उत्साहात साजरा

47

– बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांच्या बलिदानास वंदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहीदांच्या शौर्य आणि धर्मरक्षणाच्या संस्कारांना उजाळा देत भाजपाच्या कार्यालयात कर्तव्य कक्ष क्र.1 मध्ये वीर बाल दिवस भव्यतेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष रमेशजी बारसागडे, नगराध्यक्ष प्रणोतीताई निंबोरकर, मार्गदर्शक रमेशजी भूरसे, महिला अध्यक्ष योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तसेच बहुसंख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक.

कार्यक्रमाची सुरुवात शिखांचे दहावी गुरु गुरू गोविंद सिंगजी यांचे अनुयायी सूपूञ बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांनी धर्मरक्षणार्थ दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून, त्यांच्या शौर्याला वंदन करत करण्यात आली. या प्रेरक क्षणांनी उपस्थितांना प्रेरणा दिली की, कोणत्याही परिस्थितीत डगमगणे नाही आणि कोणाच्याही समोर झुकणे नाही.

जिल्हा अध्यक्ष रमेशजी बारसागडे यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनाखाली बालकांचे शौर्य, देशभक्ति आणि सामाजिक जबाबदारी यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, शौर्य आणि धैर्य हा फक्त इतिहासातील गाथा नाही तर प्रत्येक पिढीसाठी शिकण्यासारखा आदर्श आहे. रमेशजींच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांना समाजाच्या उन्नतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणा मिळाली.

त्याचबरोबर, मार्गदर्शक रमेशजी भूरसे यांनी देखील उपस्थितांना धर्म, संस्कार आणि देशभक्तीच्या मूल्यांवर आधारित प्रशिक्षण दिले. त्यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांना धर्मरक्षण आणि समाजसेवेत पुढाकार घेण्याची ऊर्जा दिली.

कार्यक्रमात उपस्थित लोकांनी बाल दिनाचे महत्त्व, शौर्य आणि बलिदानाची गाथा यावर मनमोकळेपणाने चर्चा केली. महिला अध्यक्ष योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुणघाडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी बालकांच्या शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीसाठी केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले.

सदर कार्यक्रम बालकांच्या विकासासाठी, त्यांच्या शौर्य आणि देशभक्तीच्या संस्कारांसाठी भाजपाच्या बांधिलकीचे प्रतीक ठरला. रमेशजी बारसागडे व रमेशजी भूरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत प्रभावी व प्रेरणादायी ठरला.

error: Content is protected !!