Home गडचिरोली प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

254

– आदिवासी विकास आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या सभेत निर्णय

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रम शाळेतील शासकीय व अनुदानित प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीत ४३०० ग्रेड वेतन तसेच अनुदानित आश्रम शाळेतील माध्यमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीत ४८०० ग्रेड वेतन देण्यात यावे, या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी प्रकल्प व अपर आयुक्त स्तरावर वारंवार निवेदन दिल्या जात आहे. आता लवकरच पुनश्च एक निवेदन सादर करण्यात येणार असून त्यानंतर विनाविलंब जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर प्रकल्प अथवा अपर आयुक्त स्तरावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या गडचिरोली कार्यकारिणीने दिला आहे.

संघटनेच्या गडचिरोली प्रकल्प कार्यकारिणीची सभा रविवार, २१ डिसेंबर रोजी ब्रह्मपुरी येथे पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेस प्रकल्प सचिव ज्ञानेश्वर घुटके, विभागीय सचिव विकास जनबंधू, प्रकल्प सहकार्याध्यक्ष जितू गजभिये, चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधी संतोष धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकल्प व अपर आयुक्त कार्यालय स्तरावर प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन दिल्यानंतर संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर सुद्धा पाठपुरावा करण्यात येणार आहे. न्याय न मिळाल्यास धरणे आंदोलन व शेवटचा पर्याय न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी ठाम भूमिका संघटनेचे पदाधिकारी, आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे.

सभेला शिक्षक देवानंद जांभुळकर, अजय नरुले, रमेश कोरचा, पुरुषोत्तम डोंगरवार, विजय मेश्राम, गणेश अलोने, खुशाल नाकाडे, व्ही. डी. दुधबळे, वाय. डी. गोंगल, एम. आर. शेंडे, व्ही. बी. भोयर, के. एम. वालदे, किसनदेव टिकले, आर. एस. राऊत, आर. पी. पिलारे, अविनाश डुडूल, एन. टी. ऊईके ,सुनीता मस्के, व्ही. आर. धुर्वे, वृंदा सुरजागडे, ए. पी. नाकाडे आदी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!