Home गडचिरोली संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला माणुसकीचा धर्म जीवनात अंगीकारल्यास जीवन सुखमय व शांतिमय...

संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला माणुसकीचा धर्म जीवनात अंगीकारल्यास जीवन सुखमय व शांतिमय होणार : डॉ. देवराव होळी

51

– माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुरखळा माल येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पालखी सोहळ्याचे घेतले दर्शन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल येथे पारंपरिक उत्साहात संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी पालखी सोहळ्यास १७ नोव्हेंबर भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना डॉ. होळी म्हणाले की, “संत ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला माणुसकीचा धर्म शिकवला. त्यांनी सांगितलेली प्रेम, करुणा, समतेची शिकवण आपण जीवनात आचरणात आणली तर राग-द्वेष नष्ट होऊन समाजात सद्भावना निर्माण होते. मानवसेवेच्या मार्गाने चालल्यास जीवन अधिक सुखकर आणि शांतिमय होते.”

याप्रसंगी डॉ. नागपुरे महाराज, मुरलीधर मंगर महाराज, शामराव बुरे महाराज, बंडूजी गव्हारे, भैय्याजी बट्टे, दीपक बोडकलकर यांसह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!