Home गडचिरोली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धानोरा व गेवर्धा येथील एकलव्य शाळेचे ऑनलाईन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धानोरा व गेवर्धा येथील एकलव्य शाळेचे ऑनलाईन भूमिपूजन

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील धानोरा व कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडलेल्या भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमास धानोरा येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार, मुकेश गेडाम, केवल गण्यारपवार, एमएसईबी अभियंता दितेश पारेख, मुकूल बोडगेवार, संदीप सपकाळ, मनोज पंधारे, लाभ सिंह, मनोज चौधरी, साहिल वाट्स, राहुल राठोड, पराग मेश्राम आदी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल इमारतीच्या भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमास विनोद लांजेवार, राहुल पाटील, गुणवंत फाये आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!