Home गडचिरोली पोर्ला येथील शिवमंदिरात तीन दिवसीय ग्रामगीता वाचन सप्ताह

पोर्ला येथील शिवमंदिरात तीन दिवसीय ग्रामगीता वाचन सप्ताह

39
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पोर्ला येथील शिव मंदिरात स्व. तुळसाबाई किसनजी दशमुखे स्मृती भवन व शिव मंदिर पोर्ला तथा दै. गडचिरोली पत्रिका यांच्यावतीने 3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसीय ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
हभप डोमाजी झरकर महाराजांचे मुखकमलाद्वारे ग्रामगीता वाचन होणार आहे. सप्ताहाची सुरुवात पहाटे 5.30 वाजता सामुहिक ध्यान, सकाळी 6 ते 8 दरम्यान रामधुन आणि 8 वाजता घटस्थापनेने झाली. सकाळी 9 ते 10 वाजता ग्रामगीता वाचन, दुपारी 2 ते 5 ग्रामगीता वाचन आणि सायंकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.
उद्या, 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता सामुहिक ध्यान, सकाळी 6 ते 8 वाजता रामधुन, सकाळी 8 ते 10 दरम्यान ग्रामगीता वाचन, दुपारी 2 ते 5 ग्रामगीता वाचन, सायंकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना आणि रात्रो निरंकारी भजन मंडळ पोर्ला यांचे भजन होणार आहे. 5 नोव्हेंबरला पहाटे 5.30 वाजता सामुहिक ध्यान, सकाळी 6 ते 8 रामधुन, सकाळी 8 ते 10 ग्रामगीता वाचन, दुपारी 11 ते 12 वाजता निरंकारी भजन मंडळ पोर्ला यांचे भजन, दुपारी 12 ते 2 गोपालकाल्याचे कीर्तन आणि दुपारी 3 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केशवराव दशमुखे यांनी केले आहे.
error: Content is protected !!