Home गडचिरोली फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे गडचिरोलीत कॅंडल मार्च

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे गडचिरोलीत कॅंडल मार्च

39
Oplus_16908288

– फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा गडचिरोलीत तीव्र निषेध ; दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : फलटण (जि. सातारा) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे भव्य कॅंडल मार्च काढण्यात आले.

आत्महत्येपूर्वी संबंधित डॉक्टर महिलेने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आपल्या जीविताच्या सुरक्षेबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र, त्या तक्रारीकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे एका उच्चशिक्षित महिला डॉक्टरला आपले जीव गमवावे लागले, असा आरोप गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने केला. ही घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह* उपस्थित करते.

Oplus_16908288

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असून, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी गडचिरोली युवक काँग्रेसने केली.

यावेळी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, शहराध्यक्ष सतीश विधाते, रमेश चौधरी, नेताजी गावतुरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विवेक घोंगडे, रुपेश टिकले, लालाजी सातपुते, अभिजीत धाईत, अनिकेत राऊत, स्वप्नील बेहरे, सोनू देशमुख, अतुल राचमलवार, गौरव येणप्रेडीवार, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, कविता उराडे, यश देशमुख, जावेद खान, नितेश बालेकरमकर, संतोष भांडेकर, मिलींद बारसागडे, योगेश नैताम यांच्यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!