Home गडचिरोली आज काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

आज काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा

41

– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेवजी किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!