Home गडचिरोली जल जीवन मिशनचा गडचिरोली जिल्ह्यात उडाला फज्जा

जल जीवन मिशनचा गडचिरोली जिल्ह्यात उडाला फज्जा

66
Oplus_16908288

– शेकडो शिवसैनिकांसह शिवसेना (उबाठा) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांची जिल्हा परिषदेवर धडक

– नळयोजनांचा कामात भ्रष्टाचार, कार्यकारी अभियंत्याला निलंबीत करण्याची अरविंदभाऊ कात्रटवार यांची मागणी

– मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या समस्यांकडे वेधले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे शुध्द पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने ‘हर घर नल’ ही संकल्पना बाळगूण ‘जल जीवन योजना’ राबविण्यात येत आहे. योजनेचा मोठा गवगवा करण्यात येत असला तरी पुरता या योजनेचा फज्जा उडाला आहे. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पाण्याची समस्या लक्षात घेता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी जिल्हा परिषद वर धडक दिली. जल जीवन योजना कुचकामी ठरली असून या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कामांची चौकशी करून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी अरविंदभाऊ कात्रटवार व शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Oplus_16908288

अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मुख्य कार्यकारी यांची भेट घेऊन मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील जल जीवन योजने अंतर्गत पाणीपुरवठयाची समस्या मांडली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी अभियंत्याच्या लक्षात आणून दिले की, 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे दररोज शुध्द आणि पुरेसे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवून सदर योजना सुरू करण्यात आली. परंतु या योजनेचा गडचिरोली जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. कोटयावधी रुपये खर्च करूनही योग्य त्या व्यवस्थापनाचा अभाव, कामातील तांत्रिक चुका, कंत्राटदाराकडून दिशानिर्देशानसार कामे न करणे, निकृश्ट साहित्याचा वापर योजना कार्यान्वीत करतांना वरिष्ठ अधिकऱ्यांचे होणारे दुर्लक्ष आदी कारणामुळे ‘हर घर जल ही योजना केवळ नावापुरतीच ठरली आहे.*
*मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील गावात सदर योजना कार्यान्वीत करण्यात आली असली तरी योग्य ते व्यवस्थावन व देखभाल दुस्स्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या मुळ हेतूला हरताळ फासला जात आहे. सदर समस्या केवळ मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रापुरतीच मर्यादीत नसून जिल्ह्याच्या विविध तालुक्यात सुध्दा आहे.*
*गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात आंबेशिवणी, आंबेशिवणीटोली, आंबेटोला, मौशीचक, अमिर्झा टोली, अमिर्झा, कळमटोला, टेंभा, मरेगाव, मौशीखांब, मुरमाडी, मौशीचक, भिकारमौशी, बेलगाव, रानखेडा, गिलगाव, बोथेडा, मोहटोला आदी गावांचा समावेश आहे. या गावात योजना कार्यान्वीत करण्यात आली असली तरी पाण्याची समस्या कायम आहे. महिलांना पाण्यासाठी धावाधाव कारावी लागते. तसेच शुध्द पाणी मिळत नसल्याने जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.*
*पाणीपुरवठयाची पाईपलाईन योग्यरित्या टाकण्यात न आल्याने उंच भागातील वस्तीमध्ये नळांना पाणीच येत नाही. तर काही नळांना अल्प पाणीपुरवठा होता. तसेच पाण्याच्या टाकीची स्वच्छता होत नसल्याने नळांना गढूळ व दूषीत पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही नळ योजना सौर उर्जेवर आधारीत असल्याने नियमीतपणे पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठयाबाबत तक्रारी असतांना प्रशासनाकडून देखाभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.*
*मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठयाची समस्या तातडीने मार्गी लावावी आणि जल जीवन मिशन योजनेच्या कामांची योग्य ती चौकशी करून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.*
*याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, दिलीप वेलादी, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, गोपाळ मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुटकार, स्वप्नील जुमनाके, राजेंद्र मेश्राम, तन्मय सहारे, मिथुन शेंडे, सुनील माधवार, भूषण गुरुकार, शामराव सोरते, हितेश वाघाडे, आदित्य परसे, भूषण म्याकलवार, ज्ञानेश्वर कोयलवार, शिवम कोमलवार, बबलू काळबांधे, सुनील कोमलवार, अशोक ठाकरे, समीर ठाकरे, रवींद्र ठाकरे, भाऊराव ठाकरे, नितीन ठाकरे, दिनेश ठाकरे, जीवन सयाम, गयाबाई ठाकरे, वैशाली टेकाम, निर्मला टेकाम, भाग्यश्री ठाकरे, वंदना ठाकरे, कुमदेव आवारी, मनोहर कोसमशीले, प्रफुल मेश्राम, राजेंद्र खेडेकार, प्रवीण आवारी, जगदीश खेवले, महेश खेडेकार, हरिदास रामटेके, गुरूदास कोडाप, गुलाब शेरकी, प्रशांत हर्षे, धर्मेंद्र पेंदाम, अमित चौधरी, चंद्रकांत करेते, संदेश सूर्यवंशी, तन्मय झंजाळ, चिमण मंगर, विश्वास मारभते, संदीप चापले, कुणाल धूर्वे, मोरेश्वर वाघरे, दीपक मुनघाटे, गोपाळ ठाकूर, पुरण उंदिरवाडे, गणेश ठाकरे, अजय ठाकरे, राजु मुरतेली, साहिल निकुरे, राहुल मुरतेली, सुमित कारेते, कुणाल कारेते, लक्ष्मण निकुरे, शिवदास वलादे, वसंत करकाडे, विवेक सवसाकडे आदी शिवसैनिक व शेकडो गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.*
🚩🚩🚩
*जय महाराष्ट्र..!*

error: Content is protected !!