Home गडचिरोली विश्वमांगल्य सदाचार सभेच्या नियोजन बैठकीत महिलांच्या नेतृत्वाचा नवा जागर : देसाईगंजमध्ये उत्साहदायी...

विश्वमांगल्य सदाचार सभेच्या नियोजन बैठकीत महिलांच्या नेतृत्वाचा नवा जागर : देसाईगंजमध्ये उत्साहदायी आयोजन

39

– विदर्भ प्रांत जनप्रतिनिधी सविता संजयजी पुराम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात महिलांच्या सदाचार, सामाजिक सहभाग आणि नेतृत्व विकासाचा उत्साही संकल्प

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : “संस्कार, सामर्थ्य, सदाचार व सेवा” या तत्त्वांवर आधारित विश्वमांगल्य सभा शाखा आरमोरीच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या नेतृत्वक्षमतेला दिलेला प्राधान्य आणि सामाजिक सहभागाला दिलेले नवसंजीवन आहे.

कार्यक्रमास विदर्भ प्रांत जनप्रतिनिधी सविता संजयजी पुराम आपल्या भाषणात म्हणाल्या की, “संस्कार, सामर्थ्य आणि सदाचार हे विश्वमांगल्य सभेचे मूलतत्त्व असून समाजात निष्ठा, नैतिकता आणि सेवा भावना जागृत करणे हीच या सभेची खरी दिशा आहे.” त्यांनी महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले.

याप्रसंगी योगीता प्रमोद पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “महिलांची सामाजिक संघटना हीच परिवर्तनाची खरी शक्ती आहे. विश्वमांगल्य सभा या माध्यमातून प्रत्येक घराघरात सदाचार आणि सेवा भावना रुजावी, हे आपले उद्दीष्ट असले पाहिजे.

यावेळी विद्या कृष्णा गजबे यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, “सदाचार संस्कारातून समाजातील प्रत्येक घटकात एकात्मतेची भावना जागृत होते. आजची ही बैठक हे एक नव्या विचारांचे पाऊल आहे.” यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी देखील महिलांच्या सक्षमीकरणावर ठोस विचार मांडले.

बैठकीला माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, माजी जिल्हा परिषद सदस्या रोशनीताई पारधी, यांच्यासह प्रभाताई ढोरे, वर्षा कन्नाके, बेबी नंदा पाटील, प्रतिमा उके, अश्विनी कांबळे, शीलाताई सोनकोतरी, गिरजा कोरेटी, संगीताताई कोरेटी, समुनाताई काटेंगे, केवराताई सोनफुल, जोशना लुटे, जोशना बुराडे, हेमा कावळे, फातिमा पठाण, जोशना गडे, डॉ. रूपाली कावळे, सुनिता दखणे, राधिका झवर, कविता खडसे, रवैया हलामी, कमला गणवीर, आरमोरी क्षेत्रातील विविध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी सक्तीगानाच्या सामूहिक गायनातून एकसंधतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनीताई पारधी यांनी, तर आभार प्रदर्शन भाजपा महिला तालुकाध्यक्ष अर्चनाताई ढोरे यांनी केले. नव्या सामाजिक उपक्रमांसाठी आणि महिलांच्या सक्रिय सहभागासाठी पुढील धोरण ठरवण्यात आले.

error: Content is protected !!