विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पेंढरी येथे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील ३४६ विद्यार्थ्यांचे गोवर व रूबेला लसीकरण गुरूवार, १८ सप्टेंबर रोजी पार पडले.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये गोवर व रुबेला आजार प्रतिबंधक लसीकरण कार्यशाळा घेऊन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. हे लसीकरण १५ ते ३० सप्टेंबर २०२५ या पंधरवड्यात सुरू आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सखाराम हिचामी, डॉ. सायली मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्का सिडाम, सतीश केकरे, महेंद्र जांभुळकर, पंचशीला कोवे, दीक्षा घोडीचोर, लावण्या सोनुले, निखिता धानभाते, भूमी पढोळे, दीपाली रामटेके, रूपाली कावळे यांनी लसीकरण पूर्ण केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
लसीकरणासाठी मुख्याध्यापक अनिल सोमनकर, शिक्षक तुकाराम मडावी, रामचंद्र शहारे, किशोर गोटा, प्रमोद मिरगे, पल्लवी शेडमाके, प्रकाश रायशिडाम, होरीलाल कांबळे, विश्वनाथ चौधरी, गिरीधर पातेवार, दामा हिचामी, अधीक्षक गणेश लेनगुळे, विनायक नेवारे, प्रफुल गेडाम, परिचारिका चंद्रकला उसेंडी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.





