Home गडचिरोली कर्तव्य कक्ष गणेशोत्सव निमित्त वक्तृत्व स्पर्धा

कर्तव्य कक्ष गणेशोत्सव निमित्त वक्तृत्व स्पर्धा

64

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष क्र. १ गडचिरोली येथे गणेशोत्सवाच्या औचित्याने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा विषय होता ‘महाराष्ट्राच्या विकासासाठी गडचिरोलीचे योगदान’.

या स्पर्धेत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या विचारांद्वारे कार्यक्रमाला नवी दिशा दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वक्तृत्वकला आणि समाजाबद्दलची जाणीव वृद्धिंगत झाली. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थी घडतात आणि आपला गडचिरोली प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतो.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिलजी पोहनकर, भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तुजी सूत्रपवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेवजी सोनटक्के, पर्यवेक्षक म्हणून प्रा. रुपेंद्रजी गौर, रविंद्रजी भांडेकर, मिलिंदजी उमरे, डॉ. प्रिया सकिनलावार, डॉ. पंकज सकिनलावार उपस्थित होते.

error: Content is protected !!