Home गडचिरोली विघ्नहर्ता युवा बाल गणेश उत्सव मंडळ विवेकानंदनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

विघ्नहर्ता युवा बाल गणेश उत्सव मंडळ विवेकानंदनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

154
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विघ्नहर्ता युवा बाल गणेश उत्सव मंडळ विवेकानंदनगर वॉर्ड क्र.21 गडचिरोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हे दान करून समाजसेवा करण्याचे सत्कार्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व युवकांनी केले आहे. या प्रेरणादायी उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Oplus_16908288

या शिबिरात बंटी मेश्राम, मनोज सूर, अमोल तोडेवार, शैलेश बावणे, निलेश बावणे, प्रणय चौधरी, राहुल चामेवार, स्वप्नील चौधरी, विवेक नागदेवते, संकेत सुरणकर, शुभम कामदार, आयुष भोयर, कृष्ण वडेट्टीवार आदींनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी विघ्नहर्ता युवा बाल गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शक राकेश रत्नावार, आरोग्य सेवक समाधान तिडके, रोहित बोमनपल्लीवार, सुधा झंझाड, स्नेहल गेडाम, गायत्री ठवरे व वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!