विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणादायी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२५ वा भाग आज संपूर्ण देशभरात उत्साहात ऐकण्यात आला. त्याच अनुषंगाने गडचिरोली शहरातही या कार्यक्रमाचे आयोजन विशेष वातावरणात पार पडले.
भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. शाहूनगर प्रभागातील बुथ क्र. १०१ येथे दाखविण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उत्साहाने सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रसंगी पावसामुळे देशात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्ती, पूर व भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांची व्यथा व्यक्त केली. मदतकार्यात सहभागी झालेल्या भारतीय सेनेचे व स्वयंसेवकांचे कौतुक करून “हर पीडित का दर्द हम सबका दर्द है” असे भावनिक शब्द त्यांनी उच्चारले. यासोबतच देशातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि खिलाडी, युवा प्रेरणादायी उपक्रमांचा विशेष उल्लेख करीत त्यांनी नवचैतन्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपाचे जेष्ठ नेते परिमल सरकार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवउमेद, नवचैतन्य व देशसेवेची प्रेरणा जागृत झाली.







