विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणादायी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२५ वा भाग आज संपूर्ण देशभरात उत्साहात ऐकण्यात आला. त्याच अनुषंगाने भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या लांझेडा येथील निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन पार पडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी पावसामुळे देशात निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांची व्यथा व्यक्त केली. मदतकार्यात सहभागी झालेल्या भारतीय सेनेचे व स्वयंसेवकांचे कौतुक केले. देशातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रेरणादायी नवचैतन्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला भाजपा शहर अध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री हर्षल गेडाम, बूथ अध्यक्ष नरेश हजारे, आशिष मेश्राम, राहुल खांडरे, ओम टिंगुसले, शिवम कार्लावार, निखील गुंडमवार, निलेश आत्राम, आयुष्य न्यालेवार, देवेंद्र कुनघाडकर, रोहित नैताम, सुखीराम नैताम, लालाजी वैरागडे, विनायक नैताम, गजानन येनगंटीवार, दामोधर कुकुडकर, मिथुन नैताम, वेदान सोनटक्के, लक्की भांडेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







