Home गडचिरोली भाजपा ओबीसी मोर्चातर्फे मनोज जरांगेंच्या विरोधात निर्दशने

भाजपा ओबीसी मोर्चातर्फे मनोज जरांगेंच्या विरोधात निर्दशने

59
Oplus_16908288

– जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे प्रस्थान करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून जरांगे यांच्या मागणीला विरोध करण्यात आला.

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल केलेल्या कथित विधानाचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनावेळी पोलीस बंदोबस्त तैनात होता.

या आंदोलनात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजपा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कामगार मोर्चा प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, अनिल तिडके, सुधाकर पेटकर, डॉ. चंदा कोडवते, भास्कर बुरे, डॉ. नितीन कोडवते, विलास पा. भांडेकर, रत्नदीप पा. म्हशाखेत्री, तालुकाध्यक्ष दत्तू सूत्रपवार, शेषराव कोहळे, वासुदेव बट्टे, जनार्दन साखरे, बंटी खडसे, कीर्तीकुमार मासुरकर, गणेश दहेलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!