विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : उद्धवसेनेच्या वतीने महायुती सरकारविरोधात येथील इंदिरा गांधी चौकात 11 ऑगस्ट रोजी दुपारी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भ्रष्ट मंत्र्यांचे राजीरामे घ्या, खुर्ची खाली करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
उद्धवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात चामोर्शी मार्गावरील पक्ष कार्यालयापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत रॅली काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय शृंगारपवार, प्रा. राजेंद्र लांजेकर, नंदूजी कुमरे, कुणाल कोवे, समीर मुखर्जी, दादू रामगीरवार, मनोज पोरटे, पप्पू शेख, लक्ष्मी मने, मंगला बीरमवार, भारती मडावी, हेमलता वाघाडे, चंदना विष्णोई, तुळजा तलांडी, अश्विनी चौधरी, पवन गेडाम, चेतन उरकुडे, प्रशिक झाडे, वैभव सातपुते, गणेश धोटे, बादल मडावी, भूषण पोरटे, अमित नंदा, सोहेल शेख अशी शिवसैनिक उपस्थित होते.







