– युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी ॲड. विश्वजीत कोवासे
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध समित्या जाहीर केल्या असून त्यात कार्यकारी समितीमध्ये ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तसेच खासदार डॉ. नामदेव किरसान, आ. रामदास मसराम यांच्यासह सरचिटणीस म्हणून रविंद्र दरेकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, सचिवपदी हनमंतू मडावी, पंकज गुड्डेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विश्वजित कोवासे यांची प्रदेश काँग्रेसमध्ये सचिवपदी आणि युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिवपदी वर्णी लागली आहे.
ॲड. विश्वजित कोवासे यांनी आपल्या निवडीचे श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अलुवेरु, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गटनेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र सहप्रभारी कुणाल चौधरी, माजी खासदार मारोतराव कोवासे, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोरे, गडचिरोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदींना दिले आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड यांच्यासह इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.







