– मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची ही प्रमुख उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष विदर्भतर्फे गांधी चरखा सभागृह, सेवाग्राम रोड वर्धा येथे 28 जुलै रोजी भव्य नियोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाँ. अशोकजी उईके, मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज भैय्या अहीर, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर, राज्यमंत्री तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री डाँ. पंकज भोयर, वि. प.आमदार डॉ. परिचय फुके, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, मा. खा. तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरिशभैया शर्मा, भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष संजयजी गाते यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विदर्भातील विविध जिल्ह्यांतून आलेले भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मंडळ प्रमुख यांच्यात मोठा उत्साह पाहायला मिळाला. या मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी देखील सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार प्रा. अतुलजी देशकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांसह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी, समर्पित कार्यकर्ते देखील हजर होते.
या नियोजन मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती, बूथ स्तरावरील संघटन, प्रचार तंत्र आणि भाजपाच्या विकास कामांवर आधारित जनसंपर्क यावर सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, भाजपा पक्ष हा एक परिवार आहे .”भाजप ही केवळ एक राजकीय संघटना नसून ती सेवा व विकासाचा एक मिशन आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपाचा भगवा फडकवा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपला विजय हा गावागावात विकास पोहचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच पुढे बोलत मुख्यमंत्री सहायता निधी गरिब व गरजु लोकांसाठीच खर्च केला जाईल.” गडचिरोली जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे जात असुन हा जिल्हा औद्योगिक विकासाच्या दुष्टीने पुढे राहील, असा विश्वास व्यक्त करत भाजपा संघटनेवर मुख्यमंत्री महोदयांनी प्रतिपादन केले.
महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितले की, सरकारची सेवा जनतेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचलं पाहिजे, तलाठी सुद्धा कार्यालयात बसुन जनतेचा काम केला पाहिजे. जिवंत सातबारा महत्वाचा ठरला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत जेवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त केला ते ही अवघ्या कमी वेळात यात सैनिकांचा सन्मान आहे. “घराघरात भाजपाची धोरणं पोहचवून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ताकद वाढवावी, असे मत महसूल मंत्री बावनकुळे यांनी केले.
कार्यक्रमात भाजपाच्या विविध विभागांचे नियोजन सादर करण्यात आले. सोशल मीडिया, महिला मोर्चा, युवा मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा यांच्यासह इतर विभागांचे प्रतिनिधी आणि संयोजकही उपस्थित होते. मेळावा हा अत्यंत शिस्तबद्ध, संघटित आणि प्रेरणादायी ठरला.







