– अजब गजब विचार मंच व आमदार डॉ. मिलिंद नरोटे मित्रपरिवार यांचा पुढाकार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्राच्या मातीत अनेक लोककला जन्मल्या, फुलल्या, बहरल्या असून अशाच लोककलांचा नजराणा गडचिरोलीकर रसिकांसाठी सादर होणार आहे. अजब- गजब विचार मंच आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे मित्रपरिवार यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत ‘रंग लोककलेचा’ हा सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम २७ जुलै २०२५ रोजी सासंकाळी ७ वाजता स्थानिक आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले गोंधळ, वासुदेव, शेतकरी, आदिवासी नृत्य, भारुड, लावणी, कोळी गीत, धार्मिक नृत्य, देशभक्तीपर गीत नृत्य, महापुरुषांच्या जीवनगाथेचे नृत्यातून सादरीकरण करण्यात येणार आहे. हे सादरीकरण मुंबई येथील प्रख्यात कलावंत करणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सुभाष धंदरे, दत्तू सुत्रपवार, चेतन गोरे, विश्राम होकम, प्रवीण खडसे, सचिन मून, मिलिंद उमरे आदींनी केले आहे.







