Home गडचिरोली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली काँग्रेसचे ‘लॉलीपॉप आणि चॉकलेट’ वाटप आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली काँग्रेसचे ‘लॉलीपॉप आणि चॉकलेट’ वाटप आंदोलन

83
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 21 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यात कधी कधी  झालेल्या त्यांच्या दौऱ्यात त्यांनी कधीही जिल्ह्यातील युवक, महिल, शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला नाही. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाही. मात्र त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना फक्त मोठमोठी आश्वासनाचे लॉलीपॉप देण्याचे काम केले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चॉकलेट लॉलीपॉप युक्त केक कापून नागरिकांना लॉलीपॉप व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आमदार रामदास मसराम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, कुरखेडा तालुका अध्यक्ष जीवन पा. नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, सोशल मीडिया उपाध्यक्ष नंदुजी वाईलकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शंकरराव सालोटकर, अनिल कोठारे, घनश्याम वाढई, विनोद लेनगुरे, प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, लालाजी सातपुते, दिवाकर निसार, प्रतिक बारसिंगे, योगेंद्र झंझाड, श्रीनिवास ताटपल्लीवार, सुरेश भांडेकर, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, शालिनी पेंदाम, जे. एम. मुप्पीडवार, सुदर्शन उंदीरवाडे, द्यानेश्वर पोरटे, उत्तम ठाकरे, सुधाकर ठाकूर, रवींद्र पाल, सुशील शाह, बालू चापले, नागोराव उईके, प्रभाकर कुबडे, भूषण भैसारे, विनोद निकुरे, मेंगाजी कोडाप, निकेश कामिडवार, विजय लाड, सुरज भोयर, मनोज बोरकर, अनिल किरमे, संजूभाऊ मेश्राम, देवा लोनबले, स्वप्नील बेहरे, जावेद खान, देवनाथ टेकाम, गणेश गावडे, राणू गावडे, उत्तम आतला, छबीलाल, रुपेंद्र नाईक, लक्ष्मण राना यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!