Home गडचिरोली चामोर्शी माल येथे हत्तींच्या नुकसानीची माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडून पाहणी

चामोर्शी माल येथे हत्तींच्या नुकसानीची माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडून पाहणी

65

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २१ जुलै : आरमोरी विधानसभेचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी आपल्या वाढदिवसाचा दिवस असूनही तालुक्यातील चामोर्शी माल येथील हत्तींमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आपली वचनबद्धता त्यांनी या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्यासोबत भाजप जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, भाजप सचिव नंदू पेट्टेवार, तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, ओमकार मडावी, सरपंच ज्ञानेश्वर धारणे, रेवणनाथ निंबोर, जीवन हणवते, शेखर धंधरे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हत्तींच्या कळपाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, गजबे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माजी आमदार गजबे यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रशासनाकडे यावर योग्य कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!